Press "Enter" to skip to content

पनवेल ग्रामीण विभागासमोर कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने काम बंद आंदोलन

वीज थकबाकी वसुलीस गेलेल्या कामगाराला मारहाण : पनवेल पोलीस स्टेशन येथे आरोपीस अटक करण्यासाठी कामगारांचा घेराव

सिटी बेल | पनवेल |

पनवेल ग्रामीण विभागातील तांत्रिक कामगार विकास सांगळे पळसपे यांना थकबाकी वसुली करता विज ग्राहकाकडे गेले असता त्यांनी जबर मारहाण केली या प्रकरणात पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हेगाराला अटक करण्यात यावी. या मागणी करतात पनवेल ग्रामीण विभागातील कामगार, अभियंत, अधिकारी यांनी दिनांक १ ऑक्टोंबर २०२१ पासून काम बंद आंदोलन पुकारले असून मा.कार्यकारी अभियंता पनवेल ग्रामीण भिंगारी येथे शेकडो कर्मचारी,अभियंता, अधिकारी एकत्र येऊन झालेल्या घटनेचा निषेध करत आरोपीस तात्काळ अटक करावी अशी मागणी कार्यकारी अभियंता पनवेल ग्रामीण व पोलीस निरीक्षक पनवेल शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे केली आहे.

जोपर्यंत आरोपीस अटक करण्यात येणार नाही तो पर्यंत वितरण कंपनीतील कामगार,अधिकारी कामावर जाणार नाही अशी भूमिका संयुक्त कृती समितीची झालेल्या द्वार सेवेत घेण्यात आली.तसेच कर्मचारी यांनी मा.कार्यकारी अभियंता पनवेल ग्रामीण विभाग यांची भेट घेऊन पनवेल पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ आरोपीला करावे अशी मागणी करण्यात आली.

पनवेल ग्रामीण विभागासमोर झालेल्या द्वार सभेला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर द्वार सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, आज थकबाकी वसुली करता कर्मचाऱ्यांना मारहाण होत आहे याच राज्य सरकारचे धोरण व प्रशासनाची चुकीची पॉलिसी जबाबदार असून मात्र कामगार व अभियंते यांना खावा लागत आहे राज्य सरकारने वेळोवेळी वीजबिल माफीची केलेली गोष्ट हा त्याचा परिणाम वीज ग्राहकांच्या मानसिकतेवर झाला असून नियमित वीजबिल भरणारे वीजग्राहक सुद्धा वीज बिल भरत नाही त्यामुळे ७३ हजार कोटी रुपये थकबाकीचा डोंगर महावितरण कंपनीच्या डोक्यावर उभा आहे ही थकबाकी वसूल करणे मोठे आव्हान वीज कामगार,अभियंते,अधिकारी यापुढे आहे. हे आव्हान पेलण्याची ताकद कामगार संघटना व कामगार यांची आहे.मात्र राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळत नाही त्याचा परिणाम अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना मारझोड होत आहे. त्यामुळे कामगाराचे खच्चीकरण होत आहे. केंद्र व राज्य सरकारचा जनतेच्या मालकीच्या असणाऱ्या वितरण कंपन्या खाजगी भांडवलदारांना विकण्यासाठी वीज उद्योगातील कामगार व अभियंते यांना बदनाम करण्याचा डाव असून उद्योग खाजगीकरण करण्यासाठी अनेक प्रयोग सरकार करत आहे. कर्मचारी हा दुहेरी कात्रीत सापडला असून धरले तर चावते सोडले तर पळते अशी अवस्था कामगार यांची झालेली आहे. प्रचंड असंतोष वीज कामगार यांच्यात निर्माण झाला असून राज्य सरकारने व वितरण कंपनीच्या व्यवस्थापनाने तात्काळ लक्ष घालून वीज कामगार अभियंत्यांना संरक्षण प्रदान करावे त्याशिवाय थकबाकी वसुली होणार नाही. अशी मागणी झालेल्या दोन सभेत कॉम्रेड भोयर यांनी केली.

या द्वार सभेला विविध संघटनांचे पदाधिकारी महिला आघाडी अध्यक्षा सौ भारती भोयर वीज कामगार महासंघाचे सुनील कासारे व सचिन शिंदे, सबोडिनेट इंजिनियर असोसिएशनचे अंबाडे,कांबळे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विघुत कर्मचारी संघटनेचे रमेश आहिरे, आडे इत्यादी पदाधिकारी यांनी संबोधित केले. पनवेल ग्रामीण विभागातून सर्व संघटनांचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता वायफडकर यांची भेट घेऊन शेकडो कामगार यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशन मोर्चा नेऊन आरोपीस अटक करण्याची मागणी करण्यात आली.

More from कामगार वृत्तMore posts in कामगार वृत्त »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.