सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
पनवेल तालुक्यातील खानाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर चुकीच्या नोंदीमुळे अन्याय झालेल्या . शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासंदर्भात मा.पंडितशेठ पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने आज राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ,अलिबाग येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव , माजी आमदार पंडित पाटील, विधान परिषदेचे आमदार बाळाराम पाटील. यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली .
यावेळी शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही तसेच सदरच्या प्रकरणात लवकरच निर्णय घेणार असल्याचे ग्वाहि प्रशासनाच्या वतीने देण्यात आली .
शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करणारा पक्ष आहे सदरचे प्रकरण मार्गी लावण्याकरता सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे पंडितशेट पाटील यांनी सांगितले.







Be First to Comment