सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |
धाटाव औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या १४ गावाच्या शेती व बागायतीला व नागरिकांना हवेत सोडण्यात येणाऱ्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यला धोका निर्माण झाला आहे.
कित्येकदा याबाबत आवाज उठवूनही प्रदुषण नियंत्रण मंडळाकडुन कोणतीही खबरदारी व कारवाई होत नसल्याने याबाबात नागरिकाकडुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रोहा येथे जायचे झाल्यास नागरिकांना धाटाव औद्योगिक वसाहतीतुन जावे लागते. हजारो प्रवासी व नागरिकांना हा प्रवास नाक मुठीत धरुनच करावा लागतो. या धुरामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. कित्येक नागरिक स्वास्थ्य टिकवुन ठेवण्यासाठी मॉर्निग वॉकला जातात परंतु स्वच्छ हवेऐवजी त्यांना धुराचा सामना करावा लागत आहे.
आजुबाजुला शेतजमीन व फळबागायती असुन असुन तेथील शेतकऱ्यांचे शेती हेच उपजिवीकेचे एकमेव साधन आहे. या धुराचा भात शेती, भाजीपाला व इतर पिकावर विपरीत परिणाम होत असुन उ्पन्नात घट येत आहे. सदर औद्योगिक वसाहातीत स्थानिक पुढाऱ्यांचे ठेके चालतात. यातुनच स्वतःचे खिसे भरुन ते गब्बर झाले आहेत. स्थानिक पुढाऱ्यांकडे तक्रार करावी तर कुंपणच शेत खातय तर तक्रार करायची कोणाकडे? असा प्रश्नन निर्माण झाला आहे. परंतु याच परिस्थितीचा गैरफायदा कारखानदार मालक घेत आहेत. याचा विपरीत सामान्य नागरिकाच्या आरोग्यावर होत असुन परिसरात विविध आजार फोफावत असल्याचे दिसुन येत आहे.
औद्योगिक क्षेत्रामुळे आपला विकास होईल अशी अपेक्षा व स्वप्ने येथील स्थानिकांनी पाहिली. परंतु येथे २० ते २५ टक्के स्थानिकांना सामावुन घेऊन जास्तीत जास्त भरणा हा परप्रांतीयाचा आहे. म्हणजेच फायद्याऐवजी तोटेच जास्त असल्याने भिक नको पण कुत्रं आवर! असे म्हणण्याची पाळी स्थानिकांवर आली आहे. त्यामुळेच या सर्व विपरीत परिणामांना जबाबदार कोण ? कारखानदार मालक, प्रदुषण मंडळ, स्थानिक पुढारी? प्रशासन? की इतर असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.







Be First to Comment