सिटी बेल | पनवेल |
एकविरा कला संस्थे तर्फे भुमीपूत्र काव्य संमेलन आणि भुमीकन्या सन्मान चे आयोजन मराठी संकूल शाळा, सेक्टर R 1, करंजाडे पनवेल येथे रविवार दिनांक १०/१०/२०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात आले आहे.
यावेळी आगरी – कोळी – कराडी भाषेतील काव्य वाचन स्पर्धा घेण्यात येणार आहे. काव्य वाचनात विषयाचे बंधन नाही. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील वीस आगरी – कोळी – कराडी समाजातील महीलांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक तेजस पाटील (अध्यक्ष एकविरा कला संस्था) यांनी दिली आहे.







Be First to Comment