Press "Enter" to skip to content

कामोठे राष्ट्रवादीचा भाजपाला दे धक्का !

कामोठे वसाहतीमधील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

सिटी बेल | कामोठे |

कामोठे वसाहतीमधील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतिश पाटील यांची सभागृहातील आक्रमक भूमिका, त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी ते देत असलेला लढा आणि उठवत असलेला आवाज या सर्व गोष्टींवर प्रभावित होऊन जिल्हा सचिव अमित पडवळ यांच्या माध्यमातून कामोठे वसाहतीतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकला.

जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीच्या संकुलामध्ये या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांना न्याय देऊन त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडवल्या जातील. अशा प्रकारचा शब्द सतिश पाटील यांनी पक्षप्रवेश कार्यकर्त्यांना दिला.

सूर्यकांत शिंदे,नितीन त्रिमुखे,अनिकेत शिंदे,महेंद्र जाधव,मंदार राजम,पांडुरंग हारूपे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी आले. यावेळी युवा नेते ॲड तुषार पाटील, जिल्हा सचिव अमित पडवळ , राष्ट्रवादी व्हि. जे .एनटी सेलचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष आनंद भंडारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते प्रशांत रणवरे , कार्यालयीन प्रमुख माणिकराव म्हमाणे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.