महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील रंगकर्मींनी मुंडण करून घातलं सरकारचे श्राद्ध
सिटी बेल | पुणे |
७ ऑक्टोबर पासून सर्व धार्मिक मंदिरे खुली होत आहेत परंतु आमच्या सर्व प्रकारच्या रंगकर्मिंवर मात्र अन्याय होतो आहे.आपली रंगमंदिरे, चित्रपट गृह, नाट्यगृह, खुले सांस्कृतिक कार्यक्रम ७ ऑक्टोबर पासूनच सुरु करायला पाहिजेत तरच नवरात्रौसवात बऱ्याच कलाकारांना काम मिळेल .

कित्येक महिने काम नाही पैसे नाहीत. नवरात्रौसवामध्ये कार्यक्रम मिळाल्याने काही कलाकारांच्या घरात काही थोडे तरी पैसे येतील ज्यामुळे दसरादिवाळी लेकराबाळंसह कलाकार थोडीतरी आनंदात साजरा करू शकतो नाहीतर त्यांची दसरा दिवाळी अंधःकार्मय, उदासीन होईल.

सरकारला जागं करायला, पुन्हा विंनती करायला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील रंगकर्मी आज सोमवार दि २७ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर घाट (मंदिर ) नारायण पेठ बालगंधर्व रंगमदिराच्या मागे, आपल्या महत्वपूर्ण मागण्यानंसह पितृस्मृती आंदोलन केले. काही कलाकारांनी मुंडण सुद्धा केले .







Be First to Comment