बँक ऑफ महाराष्ट्र पनवेल येथे चार संघटनांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने
सिटी बेल | पनवेल|
ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना व महाबँक नवनिर्माण सेना या प्रमुख संघटनांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एक दिवसीय लाक्षणिक संप कर्मचारी भरतीसाठी करण्यात आला.
ह्या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र, पनवेल येथे चारही संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी एकत्र येऊन आपल्या प्रमुख मागणीसाठी निदर्शने दिली व बँक ग्राहकांना बँक कर्मचारी संपावर का जात आहे याची पत्रके वाटण्यात आली.

याप्रसंगी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे असिस्टंट सेक्रेटरी, अरविंद मोरे म्हणाले की, दिवसेन दिवस बँकेचा व्यवसाय, नफा वाढत आहे मात्र बँकेचा कर्मचारी वर्ग हा दिवसेन दिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे. अरविंद मोरे पुढे म्हणाले की, बँक कर्मचारी संघटनांनी हा संप कुठल्याही आर्थिक फायद्यासाठी केला नाही आहे तर बँकेत कर्मचाऱ्यांची भरती करावी, ग्राहकांना चांगली ग्राहक सेवा मिळावी व बँकेची अधिक प्रगती व्हावी यासाठी करण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले की, बँकेत कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे कामाचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला असून त्यामुळे त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या स्वास्थावर होत आहे. बँकेच्या ५५ शाखांमध्ये एक ही लिपिक नाही, जवळपास ७०० शाखांमध्ये शिपाई नाही. सुरक्षा कर्मचारी नाही. हंगामी कर्मचाऱ्यांना गेली कित्येक वर्ष रिक्त जागेत सामावून घेतले जात नाही. अशा ही स्थितीत कोरोना महामारीत सुद्धा बँकेने चांगली कामगिरी केली आहे ती सध्याच्या बँक कर्मचाऱ्यांच्या समूह भावनेतूनच.

बँकेने बँकिंग उद्योगात व्यवसाय वृद्धीत अव्वल कामगिरी केली आहे ही सुद्धा सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावरच. बँकेत कर्मचारी भरती करणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले. जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर भविष्यात संघटना अधिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला व पुढील महिन्यात २१ व २२ ऑक्टोबरला दोन दिवसीय देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात येईल.
याप्रसंगी अस्मिता गुणे, आकाश शिरवय्या, विजयकुमार पाटील, अमोल पवार, सीमा मराठे, कमलेश सराफ, नरेश यादव, माहेश्वरी नाईक, शिवाजी दळवी, सुनेत्रा परांजपे, विरेंद्रकुमार श्रीवास्तव, अमोल भोईर, उदय कांबळे, सागर शिंदे, वामनराव गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.







Be First to Comment