सिटी बेल | कळंबोली | विकास पाटील |
कळंबोली राजे शिवाजीनगर रहिवासी मंडळ , एनएसएस ग्रुप विद्यार्थी व टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला रक्तदात्याने उत्स्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यानी सहभाग घ्यावा म्हणून सरस्वती काँलेज आँफ इंजिनिअरींच्या मुख्याध्यापिका डाँ. मंजुषा देशमुख यांनी प्रयत्न केले. तर या कार्यक्रमाची जबाबदारी डाँ सुनिता पाल यांनी यशस्वीपणे पार पाडली.

यावेळी संकलित करण्यात आलेले रक्त विविध रुग्णालयांना देण्यात आले . शिवसेना उपशहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर , विजया कदम , मंडळाचे अध्यक्ष विशाल गावंड आदींच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली .







Be First to Comment