Press "Enter" to skip to content

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी करून घेतली प्रभागात साफसफाई

सिटी बेल | पनवेल |

स्वच्छ भारत सर्वेक्षणांमध्ये पनवेल शहर एक कचराकुंडी मुक्त शहर असेल यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहते.नगरसेवक विक्रांत पाटील यांनी आपला प्रभाग सुंदर व स्वच्छ प्रभाग असावा यासाठी महापालिका आरोग्य विभाग सोबत जोरदार प्रयत्न चालू केले आहेत.

प्रभागातील हॉटस्पॉट ठरत असलेली ठिकाणे-आशियाना कॉर्नर,विरुपाक्ष हॉल,नवीन कोर्ट आणि शांताबाई गाडगे मार्ग येथे स्वछता मोहीम हाती घेण्यात आली.हे सर्व हॉटस्पॉट ची सफाई करून घेण्यात आली व नागरिकांना या जागी कचरा टाकू नये असे आवाहन नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने करण्यात आले.जमा झालेले ओला आणि सुखा कचरा वेग वेगळा करून घंटागाडी मध्ये टाकावा अशी विनंती येथील नागरिकांना करण्यात आली.

नागरिकांनी सुद्धा या उपक्रमाला त्यांचा सहभाग राहील असें सांगितले.आपल्या पनवेल शहराला स्वच्छ पनवेल,सुंदर पनवेलकचराकुंडी मुक्त शहर करण्याकरीता नागरिकांनी सहकार्य करावे व ओला,सुखा कचरा आणि जैविक कचरा हे तिन्ही वेगळे करून ठेवायची सवय सर्व पनवेलकरांनी अंगीकृत करून घ्यावी जेणेकरून स्वच्छ भारत सर्वेक्षणा मध्ये आपले शहर मानांकित होईल असे आवाहन नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केले. विक्रांत पाटील हे नेहमी नवं-नवीन उपक्रम प्रभागा मध्ये राबवत असतात याबद्दल नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.