गणपतीचं गाणं
तुझ्या नावाचा जयघोष गावात
तूच अधिपती गणांचा गणराज
तुझ्याच चरणी नमवून माथा
रमतो मी भजनात , देवा रमतो मी भजनात
वक्रतुंड तू गजवदना , गणराया
तूच दावीशी , मार्ग नवा जगाया
तुझी आरती गाऊन ईशा
हरतो मी गजरात , देवा हरतो मी गजरात
तुझ्यापासुनी कार्याला सुरुवात
तुझ्यावाचूनी करमेना कशात
तुला वाहूनी दुर्वा गणेशा
नमन तुझ्या चरणात , देवा नमन तुझ्या चरणात
सई मराठे, पनवेल
Be First to Comment