Press "Enter" to skip to content

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचा कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा संपन्न

सिटी बेल | मुंबई |

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतिने कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा व बूथ कमिटी स्थापना शुभारंभ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा कोकण प्रभारी बि. एम. संदीप , अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक तथा महाराष्ट्र प्रभारी मनोज बागरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष विजयजी अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन, पनवेल येथे संपन्न झाला.

या प्रसंगी इंटकचे राष्ट्रीय सचिव व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कमांडर कलावत, पनवेल शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व प्रदेश कार्याध्यक्ष गौतम आरकडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव महेश कांबळे, अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष प्रशांत पवार, सुजीत यादव, नंदू मोरे, प्रदेश समन्वयक सुनील सावर्डेकर, प्रवीण कांबळे, ऍड. केवल उके,जिल्हा अध्यक्ष मोहन गायकवाड, रामदास वाघमारे, रत्नाकर कुदळे, सुरेंद्र आढाव, रामदास जाधव, ऍड निलेश मरचेंडे,सुमेध भवर, सौं प्रिया ताजने, सौं. माया अहिरे, सौं. वंदना गजरे तसेच कोकण विभागातील जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन तसेच सूत्रसंचालन पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे पक्ष प्रवक्ते तसेच अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी सुजित यादव यांनी केले. कार्यक्रमास कोकण विभागातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.