Press "Enter" to skip to content

पनवेल महानगरपालीका हद्दीत अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट

मौजे देवीचापाड स न 5 मधील वेअरहाऊसचे बांधकाम अवैध माहीती अधिकारातून समोर

सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी | 

पनवेल महानगरपालिका हद्दीत  अनेक अवैध बांधकामे सुरु आहेत. यात प्रभाग अ मधील पाटीलवाडी ( मौजे देवीचापाड ) विनापरवानगी गोडावूनचे बांधकाम करण्यात आले असल्याची माहीती अधिकारातून समोर आले आहे.

या अनधिकृत बांधकामामुळे पावसाचे पाणी आडले जावून रस्ताच पाण्याखाली जात आहे. पालिका प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, अभियंते यांनी कानाडोळा केलेला आहे. असा अवैध बांधकामावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका अरुणा दाभणे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे लेखी निवेदनाने  केली आहे. चिरीमिरी करुन जाणीवपूर्वक अर्थपुर्ण दुर्लक्ष पालिका प्रशासनाकडून होत असल्याची तक्रार व आरोप परिसरातील  नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


महानगरपालिका पालिका हद्दीत कोणालाही कसल्याही प्रकारचे बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी संबंधित पालिकेची रितसर परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. अशी परवानगी देताना संबंधित पालिका अनेक गोष्टी व कागदपत्रे पडताळून पाहते आणि मगच सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर बांधकाम सुरू करण्याची रीतसर परवानगी देण्यात येते. पण या बांधकामासाठी कोणतेही कागद पत्र सादर न करता नावडे पालिका कार्यालयातील पालिका अधिका-याना हातीसी घेवून अशोक जैन या वेअरहाऊस मालकांनी मौजे देवीचापाडा स न 5 या जागेत अनधिकृत बांधकाम करून मोठे वेअरहाऊस उभे केले आहे त्यामुळे पालेखुर्द वावंजा गाव व प्राथमिक आरोग्य केद्राकडे जाणारा रस्ता पाण्याखाली जावून मोठी गैरसोय होत आहे.

अशा प्रकारे अधिका-यांना हाताशी घेवून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. कोणतेही नियम न पाळता, कोणतीही परवानगी न घेता संपूर्णपणे बेकायदा बांधकाम केले जात आहेत. अशीच बांधकामे पनवेल महानगरपालिकेत बेकायदा बांधकामे सर्रास  सुरु आहेत.

महापालिका प्रभाग अधिकारी,  अभियंता, विकासक,  बांधकाम जागामालक यांच्या अर्थपुर्ण मिलीभगतमुळे अशा प्रकारच्या बांधकामास सील न लावता फक्त नोटीस कागदांचा आवक जावक करुन जनतेची दिशाभूल केली जात आहे. तेव्हा अशी बांधकामे होण्यापूर्वी महनगरपालिकेची पुर्वपरवानगी घेवून बांधकामे केली तर पालिकेला कर रुपाने मदत होईल. असा अनधिकृत बांधकामाना आळा बसावा व बांधकाम विकासकाना  धाक बसावा म्हणून नगरसेविका अरुणा दाभणे यांनी मोजे देवीचापाडा स न 5 मधील जागेत करण्यात आलेले अवैध बांधकामा जमिनदोस्त करावे  अशी मागणी लेखी निवेदनाने केली आहे.  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.