उचलबांगडी करण्याची शिवसेना तालुका संघटक भरत पाटील यांची मागणी
सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी |
पनवेल मधील जनतेच्या तक्रारीचे निवारण करताना पनवेल तहसिलदारानी तहसिल पुरवठा कार्यालयातील अव्वल कारकून हसन मन्नात कामनवाले यांची बदली करताना फक्त जागेची आदलाबदल करत जनतेची दिशाभूल केली आहे. हसन कामनवाले यांच्या विरोधात अनेक तक्रारी असून त्यांच्या उचलबांगडी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील यांनी केली आहे.
कोविड -19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील सर्वसाधारण बदल्या 31 जुलै पर्यंत तर विशेष कारणास्तव बदल्या दि . 14 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करणेबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे .
महाराष्ट्र शासकीय कर्मचायांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम , 2005 मधील तरतूदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात . तथापि , कोविड -19 च्या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे , सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षांत बदली अधिनियमानुसार दि . 30 जून , 2021 पर्यंत कोणत्याही बदल्या कोविड 19 या संसर्गजन्य कोरानाचा प्रादुर्भावाचा वेळोवेळी आढावा घेऊन याबाबत पुढील आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आदेश 10 मे 2021 च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले होते .
त्याअनुषंगाने , सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षांत राज्य शासकीय अधिकारी कर्मचायांच्या बदल्यांबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे . त्याप्रमाणे पनवेल तहसिल कार्यालयातील बदल्या करण्यात आल्या पण पनवेल तहसिल पुरवठा विभागातील अव्वल कारकून हसन मन्नात कामनवाले हे गेली पाच वर्षापासून अव्वल कारकून म्हणून काम करत आहेत.

त्यांची बदली करताना फक्त जागा बदलण्यात आली आहे बाकी सर्व काम ते पुर्वीप्रमाणेच करणार आहेत. कामनवाले यांच्या विरोधातील पनवेल मधील जनतेत नाराजी आहे. त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी असून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करताना अनियमित कामाना प्रोत्साहन देण्याचे काम तहसिलदारानी केले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुका संघटक भरत पाटील यांनी केला आहे.
या कार्यालयाकडून एजंट प्रणाली राबविली जात असून बोंगस शिधापत्रिका वाटण्यात येत आहेत शिधापत्रिकेत मोठा भष्टाचार असून आर्थीक मदतीच्या सहाय्याने शिधापत्रिकेतील उत्पन्न कमी करून दिला जात आहे असा आरोपही केला आहे.








Be First to Comment