सिटी बेल | कळंबोली | विकास पाटील |
श्री संत भगवान बाबा सेवा समिती नेरूळ यांच्या वतीने कोरोनाच्या काळात जे कामगार कामावर होते अशा कामगारांचा व लोकप्रतिनिधींचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी केला.
नवी मुंबई व पनवेल मधील पोलीस खात्यात ,आरोग्य खात्यात व बेस्ट मध्ये काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला .त्यांना त्यांच्या घरी जाऊन श्री अमोल कुटे , पिंपळनेरचे सरपंच बाळासाहेब बडे, अमोल पालवे इत्यादी मंडळींनी सन्मानपत्र प्रदान केले.
बबन बारगजे यांनी कोरोना काळात बऱ्याच लोकांना मदत केली .रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने घरोघरी अन्नधान्याची किट वाटप केले त्या अनुषंगाने त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.








Be First to Comment