सिटी बेल | उरण | घनश्याम कडू |
उरण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नितीन पाटील यांचे वडील व शिक्षकनेते, सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय शहबाज या संस्थेचे माजी अध्यक्ष व आधारस्तंभ गो. तु. पाटील गुरुजी यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कोरोनाचा काळ असल्याने त्यांचे दशक्रिया विधी व दिवसकार्य गुरुवार दि.१६ सप्टेंबर रोजी शहाबाज अलिबाग येथे रहात्या घरी नातेवाईकांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.








Be First to Comment