Press "Enter" to skip to content

तळोजा एमआयडीसी क्षेत्रात ३४ एकरात दीपक फर्टिलायझर्स निर्माण करणार हरितपट्टा

वृक्षपूजन करून केली हरितपट्टा विकसित करण्याच्या उपक्रमास सुरुवात

सिटी बेल | तळोजा |

दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि स्मार्ट केम टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी तळोजा एमआयडीसी क्षेत्र येथे वृक्ष पूजन करून हरितपट्टा विकसित करण्याच्या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डी बी पाटील यांच्या शुभहस्ते वृक्ष पूजन करून या अत्यंत स्तुत्य अशा उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या वतीने दीपक फर्टिलायझर्स यांना ८० गुंठे आणि १६ गुंठे परिक्षेत्राचे दोन भूखंड हरित पट्टा निर्माण करण्याचे कामी प्रदान करण्यात आले आहेत. यापूर्वी दीपक फर्टिलायझर्स च्या माध्यमातून तब्बल अकरा एकर जमिनीवर ९ हजार ७०० झाडांचे संगोपन करण्यात आले आहे. तर भविष्यात वनविभागाच्या कडून मिळणारी वीस एकर जमीन हरित पट्ट्या खाली आणण्याचे उद्दिष्ट कंपनीने डोळ्यासमोर ठेवले आहे. हरितपट्टा निर्माण करण्याच्या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डी बी पाटील,DISH चे सहसंचालक विक्रम काटमवार, महाराष्ट्र ओद्योगिक विकास मंडळाचे सहाय्यक अभियंता सी एन पाटील, पनवेल पंचायत समितीचे सदस्य काशिनाथ पाटील, TMA चे उपाध्यक्ष संदीप डोंगरे, दीपक फर्टिलायझर्स च्या K 1 युनिट चे हेड राधेश्याम सिंग, K8 युनिट चे हेड डी बी सिंग,एच आर हेड जयश्री काटकर, कॉर्पोरेट अफेअर्स चे सीनियर जनरल मॅनेजर संतराम चलवड, कॉर्पोरेट अफेअर्स चे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट अरुण शिर्के,सी एस आर सिनियर मॅनेजर संदीप काकडे, ई एच एस सिनियर मॅनेजर नंदकुमार दबडे, ई एच एस हेड दीपक पांडे,नेती,बेल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संदीप काकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले तर दीपक पांडे यांनी आभार प्रदर्शन सादर केले. औद्योगीकरण करत असताना आपण कुठे ना कुठे तरी निसर्गास हानी पोहोचवत असतो. निसर्गाचे हे होणारे नुकसान भरून काढले तरच या भूतलावर पर्यावरणाचा समतोल राखता येईल या उद्देशाने दीपक फर्टिलायझर्स च्या माध्यमातून हरित पट्टा विकसित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवण्यात आले आहे. दीपक फर्टिलायझर्स कंपनीच्या या अत्यंत स्तुत्य उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.