कळंबोली पोलीस ठाणेहद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळ,महिला दक्षता समिती सदस्य व शांतता कमिटी सदस्य यांची बैठक संपन्न
सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी |
नुकतेच कळंबोली पोलिस ठाण्याच्या आवारात सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल भागवत सोनवणे व कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळ,महिला दक्षता समिती सदस्य व शांतता कमिटी सदस्य यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना व परवानगीबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी परवानगी घेताना सिडकोला पैसे भरावे लागतात आणि पनवेल महानगरपालिकाही आकार लावत आहे तेव्हा यातून नागरिकांची सुटका करून एकाच प्राधिकरणाने जागेचे भाडे घ्यावे असे सुचविण्यात आले. कोरोना महामारी मध्ये प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होणे व गर्दी टाळावी ह्या साठी उपाय योजना करण्याबाबत व काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले व सविस्तर माहिती देवून मिटींगची सांगता करण्यात आली.
समस्त गणेशोत्सव मंडळ,महिला दक्षता समिती सदस्या , शांतता कमिटी यांनी सहभाग घेऊन पूर्णपणे मदत कार्य चालू ठेऊ व पूर्ण सहकार्य करू याचे आश्वासन दिले. बैठकीस आम्ही वपोनि संजय पाटील, पोनि दिलीप गुजर, पनवेल महानगरपालिका, सिडको प्रशासनाचे अधिकारी, पोलीस मित्र, समस्त गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी ,महिला दक्षता समिती सदस्या , शांतता कमिटी यांनी सहभाग घेऊन पूर्णपणे मदत कार्य चालू ठेऊ व पूर्ण सहकार्य करू याचे आश्वासन दिले.








Be First to Comment