सिटी बेल | वावंजे |
शिवसेना वावंजे जिल्हापरिषद-पनवेल तालुका यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृवाखाली व पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
त्या प्रसंगी शिवसेना मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३०० ते ४०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास शेकापचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, ग्रामीण तालुका संघटक रामदास नामदेव पाटील, शाखा प्रमुख सतीश पाटील, संतोष गडगे, प्रदीप पाटील, संदीप पाटील,एकनाथ सिनारे, कृष्णा दिसले,सूरज कर्णक, श्याम माळी,विनायक ठोंबरे, गुरुनाथ भोईर, युवसेनेचे विधानसभा समन्वयक पराग मोहिते, प्रेम ठाकुर, दिनेश भोईर, तालुका अधिकारी केवळ माळी, महिला आघाडी च्या उपजिल्हा संघटिका सौ. कल्पना पाटील, विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटिका सौ. अनीता डांगरकर शिवसेनेचे आदि पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच उतीर्ण विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment