सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील सानेगाव येथील रहिवासी द्रोपदी पांडुरंग ठाकूर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
द्रोपदी ठाकूर या परोपकारी व्रुत्तीच्या तसेच सर्वांशी मिळून मिसळून व प्रेमाने वागणा-या होत्या. त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांचे आप्तस्वकीय व मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.तर समाजातील अभिजित वरंडे,सुरेंद्र जांभेकर,सुरेश जांभेकर, बाळाराम भिसू,शांताराम भिसे,रजोक गिजे,राजू कोंडे जयवंत गिजे,दिलिप मोंडे,किशोर मंचेकर,रविंद्र बावकर,अरूण मितले,शंकर पाकले, महादेव साळुंखे,विठोबा पाष्टे,नावले, नामदेव पाटील, राजू मोरे,चंद्रकांत जाधव,सुरेश वाघमारे,पांडुरंग वाघमारे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,सुना,जावई व नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी ११ सप्टें.रोजी तर अंतिम धार्मिकविधी १२ सप्टेंबर रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment