Press "Enter" to skip to content

शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शेकाप कार्यकर्ते शिवसेनेत

शेकापला भगदाड : माजी सरपंच,उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सिटी बेल | पनवेल |

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाचे बेलवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच नरेश पाटील, माजी उपसरपंच वारदोली अरुण पाटील यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य बेलवली महेंद्र म्हात्रे, विनायक पाटील, सुनाद पाटील, दिनेश ढोपरे, दत्ता पाटील, रोहित पाटील, आतिष मोकल, प्रथमेश ढोपरे व वार्दोली ग्रामपंचायत सदस्य चे रविंद्र शेळके यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

या प्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात स्वागत केले. या वेळी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संघटक भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, विभाग प्रमुख नंदू घरत आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.