प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घडवून आणला सन्मान
सिटी बेल | मुंबई |
इंडियन आयडॉल विजेते पवनदीप राजन आणि अरूनिता कांजीलाल यांचा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आणि सहकारी यांनी विशेष सन्मान केला.या नंतर या दोन्ही मान्यवरांची विशेष भेट भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांच्या सागर निवास स्थानी घडवून आणली. देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचा उचित सन्मान केला.

यावेळी या दोन्ही मान्यवरांचा आतापर्यंतचा संघर्ष आणि मिळविलेले यश या विषयी छान गप्पा झाल्या, दोघांनी ही सुमधुर आवाजात गाणी सादर केली.त्यांच्या सुरेल आवाजाचे देवेंद्र जी फडणवीस आणि उपस्थित सर्वच मान्यवरांनी फार कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राची लेक सायली कांबळे ह्या जोधपूर येथे शुट्टिंग निमित्त गेल्या असल्याने त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.लवकरच त्यांचाही सन्मान करण्यात येणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी यावेळी सांगितले.












Be First to Comment