कान्हामय गोकुळ
कान्हाच्या बालक्रिडेत रंगले गोकुळ
राधाकृष्ण रासक्रीडेत मुग्ध गोकुळ
दूध दही लोणी चोरूनी खाई कान्हा
मौज भारी वाटूनी हास्य करी कान्हा
बाजारी जाताना आडवा येई कान्हा
हंडीतील लोणी खाऊनी छेडी गोपींना
पावा वाजवूनी मंत्रमुग्ध करी सकलांना
सवंगड्यासह यमुनातीरी खेळ खेळे कान्हा
कालियाचे गर्वहरण तूच करीसी
निर्भय केले सर्व तू गोकुळवासी
राधाकृष्ण प्रेम रंगे गोकुळी
नाम वदनी अन् कृष्ण वसे ह्रदयी
सर्वांचा सखा,जिवलग असे हा कान्हा
नीलवर्ण लेवुनी हा मोहवी मना
मोरपीस शोभे शिरी मुकुटावर
हाती पावा मंजुळ वाजे मुखावर
भक्तांना रक्षिसी गिरी उचलूनी करांगुली
इंद्रासही नमविले भक्तांना तारूनी
आज वाटे यावे कान्हाने परतुनी
आर्त हाक ऐक कान्हा दिली भक्तांनी
नयना पेंढारकर, नवीन पनवेल
Be First to Comment