सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मृणाल गायकवाड यांच्या एंटरटेंनमेंट आयोजित कार्यक्रमात मिस हेरिटीज इंडिया स्पर्धा पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पङली या स्पर्धेत माथेरान येथील तसेच सध्या महाबळेश्वर येथे वास्तव्य असलेले कु.’हर्षा विनोद शिंदे ही या स्पर्धेची मिस हेरिटीज इंडिया ची मानकरी ठरली या स्पर्धेत एकूण देशभरातुन सतरा युवतींनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेची मानकरी ठरवलेली मराठ मोळी हर्षा हीचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तसेच अभिनेत्री हेमांगी कवि यांनी मुकुट चढवून कौतुक केले. हर्षाने आपल्या या यशामागे आई वङिलांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले तसेच मेहनत हीच यशस्वी जीवनाची गुरू किल्ली असल्याचे हर्षा सांगते. लेखन व निसर्ग, व्यक्ती, वास्तू पेंटींग हा हर्षाचा छंद आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जागतिक स्पर्धेच नेतृत्व करणार असल्याचा मानस हर्षाचा आहे
हर्षा ही माथेरानच्या माजी नगसेविका वासंती जांभळे यांची नात आहे त्यामुळे माथेरान मधुन हर्षा वर कौतुकाचा वर्षाव होत आहे . हर्षा म्हणते स्त्री म्हणजे वास्तल, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृव, स्त्री म्हणजे राणी येसुबाई सारखे कर्तृत्व हेच कर्तृत्व प्रत्येक मुलीने करावे अशी ईच्छा प्रत्येक आई वङिलांची असते हेच स्वप्न हर्षाने पुर्ण केले.








Be First to Comment