सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
महापुराने बाधित झालेल्या कुटुंबांना भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या आदेशानुसार ,संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार व संस्थेचे राष्ट्रीय महासचिव जगदिश गवई साहेब यांच्या सुचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी,धरणगुत्ती, नरसोबाची वाडी,गौरवाड, शेडशाळ, कवठेगुणंद, गणेश वाडी,बस्तवाड, आकिवाड, राजापूर या ठिकाणी मदत वाटप करण्यात आली.
यावेळी संस्थेचे राष्ट्रीय महासचिव जगदिश गवई साहेब, महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष भिकाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य शाखेचे सरचिटणीस सुशील वाघमारे, महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन उपाध्यक्ष मधुकर भोसले, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष एस.पी.दिक्षित,शिरोळ तालुका शाखेचे अध्यक्ष संतोष भुयेकर,शिरोळ तालुका सरचिटणीस शितल कांबळे, कोषाध्यक्ष रितेश कांबळे,संरक्षण उपाध्यक्ष अमित कांबळे,बबन कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वाटप प्रसंगी मदत वाटपाचे स्वागत करण्यात आले तसेच संस्थेप्रती पुरग्रस्तबांधवांनी समाधान व्यक्त केले.








Be First to Comment