Press "Enter" to skip to content

वाचा कोण आहेत भाऊसाहेब शिंदे ? “या” अभिनेत्रीचे आहेत ते बंधु

जगातील सर्वात तरुण समाजसेवक म्हणून भाऊसाहेब शिंदे यांना WORLD BOOK OF RECORD EUROP पुरस्कार

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

ग्रामीण भागातून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, समाजाला उन्नतीच्या दिशेला नेऊ प्रत्येक सामाजिक कार्यात ज्यांनी आपला सिंहाचा वाटा ठेवला अश्या सर्वात तरूण समाजसेवक म्हणूण भाऊसाहेब शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल युरोप ने घेतली असून त्यांना WORLD BOOK OF RECORD EUROP ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले जाते.भाऊसाहेब शिंदे यांची सामाजिक बांधिलकी सातासमुद्र पार असलेल म्हणणं वावगं ठरणार नाही. गरीब विद्यार्थ्यां च्या शिक्षणा साठी शिंदे नेहेमी धावून जातात. अशा बहूआयामी तरूण व्यकती महत्वाची नोंद WORLD BOOK OF RECORD EUROP मध्ये करण्यात आली आहे.भाऊसाहेब शिंदे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात दोन हजार पेक्षा जास्त शिबिरे घेतली एवढेच नव्हे तर अनेक आंदोलने व उपोषण करून सर्व सामन्य लोकांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्र राज्यात वृक्षारोपण केले.
गरीब व गरजूंना अन्नधान्य व किराणा वाटप करण्यात आले तसेच गरीब महिलांना संपूर्ण महाराष्ट्र भर दहा (१०) लाख साङया वाटप केल्या. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी राज्य सरकार कडे पाठपुरावा करून यश मिळवले.

आज भाऊ शिंदे यांच्या वयाचा विचार करता अगदी २८ व्या वयात त्यांनी आपल्या कार्याची चमक दाखवली असून भाऊ शिंदे च्या कर्तबगार पणाचा आदर्श इतर तरुणांइला घेण्यासारखा आहे. त्यांनी आपले विद्यालयाचे शिक्षण पूर्ण करून नोकरींला बलिदान करत लोकांच्या सेवेत लागले. अंधाचे डोळे, अनाथानाचे नाथ, लंगड्याचे पाय, निराधारांचा आधार बनून भाऊ अनेकांना धावून गेले. स्वतःची परवा करता प्रत्येकवेळी समाजाच्या आणि गरजू लोकांचा विचार करत अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. आज अहमदनगरलाच नाही तर महाराष्ट्र मध्ये नावाजलेले व्यक्तीमहत्व म्हणून भाऊ शिंदे कडे पाहिले जाते.

कोण आहेत भाऊसाहेब शिंदे ?

प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिपाली (ताई) भोसले सय्यद यांचे बंधू भाऊसाहेब शिंदे.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोदा तालुक्यातील भानगाव या त्यांच्या मामा च्या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मुळ गाव हे नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्या नंतर त्यांचे काॅलेज चे शिक्षण अहमदनगर येथे पुर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्या नंतर शिंदे यांना एका बँकेत शिपाई या पदावर घेण्यात आले त्या ठीकाण च काम पाहून त्यांना कॅशियर या पदावर प्रमोशन भेटले पण भाऊसाहेब शिंदे यांच मन मात्र तिथे रमल नाही. त्यांनी ही नोकरी सोडून थेट भेट त्यावेळी चे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेब यांना दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेटले साहेबांना सांगितले मी नोकरी सोडली व पवार साहेबांच्या पायाला स्पर्श करुन आशिर्वाद घेतला. त्या वेळी शरद पवार साहेबांनी त्यांना विचारले आता पुढे काय करणार त्या वेळी त्यांनी साहेबांना सांगितल मला तुमच्या सारख बनायचय त्या नंतर पवार साहेबांनी त्यांना एक कानमंत्र दिला त्या नंतर त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आणि ते काम करत करत लोकांची सेवा करण्याची संधी भाऊला मिळाली. त्याचा दीपाली ताईचा हात डोक्यावर असल्याने अनेक प्रश्न त्यांनी तात्काळ सोडवले आहेत.त्यामुळे भाऊंच्या सामाजिक कार्याची दखल WORLD BOOK OF RECORD EUROP ने नुकतेच सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन केले जात आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.