सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
प्रभागातील विकास कामांच्या बरोबर,प्रभागातील समस्यांचे निरसन करणे आणि प्रभाग स्वच्छ कसा राहील याकडे नेहमीच कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांचं जातीने लक्ष असतं.
प्रभागात ठाणा नाका रोड आणि टिळक रोड इथे कचरा उचला गेलेला नाही अशी माहिती प्रभागातील काही दक्ष नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना दिली.नागरिकांच्या आरोग्य विषय लक्षात घेता त्यांनी त्वरित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित कचरा उचलण्यास सांगितले.
महापालिकेच्या स्वच्छता विभागाने त्वरित कचरा उचलून साफ सफाई करून घेतली. “माझा प्रभाग,माझी जवाबदारी” या अनुषंगाने नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच काम करत आले आहेत या बद्दल प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.








Be First to Comment