सिटी बेल | उलवे | विठ्ठल ममताबादे |
बामणडोंगरी गावाजवळ सातत्याने रस्त्यावर नागरीक कचरा टाकत होते. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून त्याचा उग्र वास सर्वत्र पसरत होता.त्यामुळे तिथे राहत असलेल्या लोकांना त्याचा त्रास होत होता. शिवाय नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते.म्हणून मनसेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी यांनी पाठपुरावा करून तो कचरा पुर्ण साफ करून तिथे सिडको मार्फत बोर्ड लावुन घेतले.

यावेळी गव्हाण विभाग अध्यक्ष तुषार सुनिल म्हात्रे, उरण विधानसभा उपाध्यक्ष श्रीमत रविंद्र घरत, उलवे शहर उपाध्यक्ष-आकाश देशमुख, उलवे शहर शाखाध्यक्ष -अशोक वडांगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कचरा साफसफाई केल्याने सदर परिसर स्वच्छ व सुंदर झाला आहे. येणारे जाणारे ग्रामस्थ, नागरिक, प्रवाशी वर्गांनी निर्दोष गोंधळी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे.








Be First to Comment