सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन,दिल्ली यांच्या वतीने कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचे कोरोना योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी नियुक्ती पत्र वितरणाचाही कार्यक्रम पार पडला.हा सोहळा हाॅटेल न्यु सुखसागर मालेगांव येथे संपन्न झाला.यावेळी संस्थेची ध्येय धोरणे याची माहिती देण्यात आली.यावेळी ॲंड शिशिर हिरे यांनी मानव अधिकार या विषयावर अत्यंत प्रबोधनामत्मक माहिती दिली.
या सोहळ्याला प्रमुख मान्यवर ॲड.शिशिरजी हिरे विशेष सहकारी वकिल महाराष्ट्र शासन मुंबई हायकोर्ट यांच्या हस्ते मालेगाव येथे समाजसेवक व जेष्ठ पत्रकार अविनाश म्हात्रे यांच्या कार्याचा गौरव करुन कोरोना योध्दाने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी खंडेराव शेवाळे शेतकरी राजा कृषिभूषण पुरस्कार विजेते महाराष्ट्र शासन, राजेंद्र आहेर ,राष्ट्रीय अध्यक्ष जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन श्रीमती रेखा सोलंकी राष्ट्रीय अध्यक्षा, बाबासाहेब बनसोडे राष्ट्रीय महासचिव, प्रदीप पाटील राष्ट्रीय सचिव,खेमराज कोर राष्ट्रीय जाॅइंट सेक्रेटरी,राम घरत कार्यकारी सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश, डाॅ.सुनिल निकम महाराष्ट्र सचिव,नाना भाऊ वाघ, श्रीमती शबिया शेख गोवा प्रदेश अध्यक्षा,पल्लवी आहेर सल्लागार जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन,आयोजक अनिल जाधव उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, सुनिल सुर्यवंशी युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व अनेक मान्यवर उपस्थित होते.अविनाश म्हात्रे यांना त्यांच्या कार्याबद्दल याअगोदरही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील बराचसा काळ घालविला आहे.त्यांची कुष्ठरोग सेवक अशीही ओळख आहे.अविनाश म्हात्रे यांना विशेष सरकारी वकील अँड शिशिर हिरे यांच्याहस्ते कोरोना योध्दाने गौरविण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment