Press "Enter" to skip to content

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ खारघरमध्ये शिवसेनेचा निषेध मोर्चा

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्य विधानामुळे सर्व महाराष्ट्रभर शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. या अनुषंगाने शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत (पनवेल विधानसभा) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पनवेल विधानसभा यांच्या वतीने राणे यांच्या विरोधात खारघर येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच नारायण राणे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी खारघर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.

सदर आंदोलनास जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्यासह उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत,यतीन देशमुख, सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख , युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, सर्व शहर अधिकारी, महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, उपतालुका संघटिका सौ. टीया अरोरा-धुमाळ, उपमहानगर संघटिका सौ. रीना पाटील, शहर संघटिका सौ. अपूर्वा प्रभू, विभाग संघटिका सौ. संगीता राऊत आदि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.