Press "Enter" to skip to content

कोरोना योध्यांनी मनगटावर बांधली चिमुकल्या हातांनी बनविलेली राखी

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

काल देशभरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा झाला असून अनेक  ठिकाणी कोरोना योध्यांना राखी बांधण्यात आल्या. कोरोनाची लढाई अजूनही संपली आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून आपल्या जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा बजावणारे तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या  डॉक्टर,नर्सेस  सफाई कर्मचारी यांच्यासह इतर सेवा देणाऱ्यांना केजीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या  बांधून एक आगळावेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम करण्यात आला.

नेरुळ येथील नरचरींग रूट शाळेच्या छोट्या मुलांनी बनविलेल्या राख्या तेथील शिक्षकांनी तेरणा हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना सेवा देत असलेल्या डॉक्टर्स नर्सेस व इतर पॅरा मेडिकल स्टाफला बांधल्या. या चाळीस राख्या शाळेतील लहान मुलांनी घरी  बनविल्या होत्या.  कोरोनामुळे शाळा सुरु झालेल्या नाहीत तरीही या चिमुकल्यांनी  घरी बनविलेल्या राख्या त्यांच्या पालकांनी शाळेमध्ये आणून दिल्या होत्या.

राखीपोर्णिमा भाऊ-बहिणीचा सण पण सध्याच्या या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच सण उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहे. पण खऱ्या अर्थाने राखी पौर्णिमेचा सण हा या कोरोनाच्या काळात साजरा करण्यासारखा आहे. कोरोना काळात हे सर्व अत्यावश्यक  सेवा देणारे आपल्यासाठी सेवा पुरवणारे सर्व कोरोना योद्धा हे सन्मानास पात्र आहेत.

आपल्या संस्कृति प्रमाणे  जे हात आपल्या रक्षणासाठी आपल्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा  न करता नेहमी पुढे असतात ते हात राखी साठी पात्र असतात. हा सण आरोग्यसेवा  देणाऱ्या सर्वासोबत साजरा करुन त्यांना ते करत असलेल्या कार्याचा सलाम आणि कौतुक म्हणून साजरा केल्याची भावना या शाळेतील शिक्षकांच्या चेहऱ्यावर होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.