Press "Enter" to skip to content

रेशन दुकानदारांचे उप आयुक्त (पुरवठा) कोकण विभाग यांना निवेदन

लाभार्थी रेशनकार्ड यादीसह लेखी परिपत्रक व दुकानात धान्य वजन माप करून मिळण्याची मागणी

सिटी बेल | पनवेल |

पनवेल तालुक्यातील बायोमेट्रिक लाभार्थी रेशनकार्ड धारकांना देण्यात येणाऱ्या धान्यात कपात केल्यामुळे, लाभार्थी रेशनकार्ड यादीसह लेखी परिपत्रक व दुकानात धान्य वजन माप करून मिळावे त्याचप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड अलिबाग यांच्यावर (Contempt of Court) न्यायालयाचा अवमान अंतर्गत कारवाई अशी मागणी रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेता वेलफेअर असोसिएशन पनवेल चे अध्यक्ष भरत पाटील यांनी उप आयुक्त (पुरवठा) पुरवठा कोकण विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मा.उच्च न्यायालयाने रास्त भाव धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक व बॅंक खाते क्रमांक ERCMS मध्ये सिडींगकरीता उपलब्ध न केल्यास त्या दुकानदारांचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात येवू नये अथवा रास्त भाव धान्य दुकानदारांचा कोटा कमी करण्यात येवू नये तसेच मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे याची दक्षता संबंधित सर्व अधिकाऱ्यांना घ्यावी असा अंतरिम आदेश देणेत आलेला आहे.

वास्तविक पाहता अंतरिम आदेशाबाबत संबंधित सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी,सर्व अन्न धान्य वितरण अधिकारी,सर्व उप आयुक्त पुरवठा, यांना महाराष्ट्र शासना तफेॅ पत्र पाठविण्यात आलेले होते ‌सदर पत्राचे अवलोकन न करता जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मा. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा उपमर्द केलेला आहे,या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड अलिबाग यांच्यावर (Contempt of Court) न्यायालयाचा अवमान अंतर्गत कारवाई होणे आवश्यक व गरजेचे आहे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.