Press "Enter" to skip to content

रोटरी क्लब ऑफ़ पनवेलच्या वतीने खांदेश्वर पोलिस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | पनवेल | सुनिल ठाकूर |

आज रक्षाबंधन अशा पवित्र दिनी रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर च्या वतीने खांदेश्वर पोलीस स्टेशन येथे जाऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

खांदेश्वर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. डी डी ढाकणे आणि त्यांचे सर्व पोलीस सहकारी बांधवाना रोटरी, रोट्रॅक्ट, इन्ट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल महानगर, अलिबाग तालुका रहिवाशी संघटना, रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन, सोहम मित्र मंडळ, अलकाज हेल्थ आणि ब्युटी पार्लर तर्फे राखी बांधण्यात आली, तसेच यावेळी क्लब तर्फे पोलीस बंधू भगिनींना स्टीमर, तुलसी रोपे, फुले आणि मिठाई देऊन त्यांच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

सदर कार्यक्रमास रोटरी जिल्हा झोनल चेअरमन रो. अलका कोळी -तोडणकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर चे प्रेसिडेंट रो. रवी नाईक, रोट्रॅक्ट अध्यक्ष -कु. निशा तळेकर व ऋग्वेद कांडपिळे, रोट्रॅक्ट माजी अध्यक्ष सोहम कोळी, प्रतीक जेवूरगी, जिमला वोरा, इन्ट्रॅक्ट माजी अध्यक्ष दिव्या मोरे, रो. सुवर्णा पाटील, रो. मंगल तळेकर, लक्ष्मण पाटील आदी सभासद उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.