Press "Enter" to skip to content

पमपा क्षेत्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह स्वच्छता दूतांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र द्या

नगरसेवक रवींद्र भगत यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील डॉक्टर , नर्स , आरोग्य कर्मचारी , आशा वर्कर्स , झाडू सफाई कर्मचारी , ऑफिस स्टाफ , अधिकारी वर्ग , वाहन चालक , अतिक्रमण विभागातील कर्मचारी , व इतर कर्मचा – यांना कोरोना योध्दा प्रमाणपत्र देण्याची मागणी नगरसेवक रवींद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या कालखंडामध्ये गेल्या 2 वर्षभरापासून अत्यंत बिकट परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर , नर्स , आरोग्य कर्मचारी , आशा वर्कर्स , झाडू सफाई कर्मचारी , ऑफिस स्टाफ , अधिकारी वर्ग , वाहन चालक , अतिक्रमण विभागातील कर्मचारी व इतर कर्मचारी यांनी कोव्हीड योध्दे बनून आपले कर्तव्य आहोरात्र पार पाडत आहेत . या कोव्हिड योध्दयांमुळेच खर तर कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे . या सर्व कर्मचा – यांनी देवदुतासारखे काम केले आहे . याचा मला अभिमान वाटतो .

सदर उक्त विषयातील महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने विशेष गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून कोव्हिड योध्दा म्हणून काम केलेल्या सर्वाना याचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना कार्यरत करण्यात आली आहे तरी योजनेचा वरिल विषयातील सर्वांना लाभ मिळण्या करिता कोव्हिड योध्दा प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.