Press "Enter" to skip to content

श्री साई संस्थान वहाळ येथे करण्यात आला सेवानिवृत्तांचा सन्मान

संगीत शिक्षक विद्याधर ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार

सिटी बेल | वहाळ |

के वी कन्या स्कूलचे संगीत शिक्षक विद्याधर ठाकूर यांचे श्री साई देवस्थान साई नगर वहाळ यांच्या माध्यमातून सेवानिवृत्ती सन्मान करण्यात आला.

गेले कित्येक वर्ष संगीताच्या माध्यमातून सेवा करणारे विद्याधर ठाकूर आणि त्यांचा संच याने समाजासाठी मग कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा किंवा राजकीय कार्यक्रम असेल आणि महाराष्ट्र गीत( महाराष्ट्र माझा) हे गीत सरांनी गायल्या नंतर प्रेक्षकांचा अंगावर काटाच उभा राहिला पाहिजे. अशा पद्धतीचे सादरीकरण सतत त्यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे संगीताची ओढ असलेले के वी कन्या चे शिक्षक ठाकूर सर बोलल्यानंतर प्रत्येकाच्या नजरे समोर येणारा प्रसन्न मुद्रा चेहरा असा त्यांचा गोड स्वभाव त्यामुळे साई देवस्थान साई नगर वहाळ येथे त्यांना बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी साई देवस्थानचे ट्रस्टी मढवी गुरुजी, साई देवस्थान अध्यक्ष रवीशेठ पाटील, धनाजी पाटील, राजू मुंबईकर, राहुल म्हात्रे ( पावतु सामाजिक संस्था अध्यक्ष ), माधुरी गोसावी, पार्वती पाटील (मा सदस्य जिल्हा परिषद गव्हाण), सुरेखा मुंबईकर, वैजनाथ मुंबईकर तसेच साई देवस्थान साई नगर वहाळ संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.