सिटी बेल |नवी मुंबई |
आपल्याकडे रक्षाबंधनाचे खूप महत्व असून रक्षाबंधन हा सण जात-धर्म लिंगभेद या पलिकडे जाऊन साजरा केला जातो. गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी रक्षाबंधन हा सण कोरोनाच्या सावटाखाली असल्यामुळे योग्य ती काळजी घेऊन हा उत्सव साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने आदेश दिले असून नागरिक योग्य ती काळजी घेत आहेत.
नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरे झाले, रक्षाबंधन हा भाऊ व बहीण यांचे नाते अधिक दृढ करण्याचा सण आहे परंतु आज कोरोना कालावधीत दिवस रात्र मेहनत घेत असलेल्या व आता कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी असलेल्या नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या परिचारिकांना कोरोना लस घेतलेल्या नागरिकांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
आज लस घेतलेल्या अनेक पुरुषांनी शुश्रूषा हार्ट केअरच्या परिचारिकांना राख्या बांधल्या. कोरोना संकटात याच परिचारिका आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना आरोग्य सुविधा देत असल्याच्या भावनेतूनच नेरूळ येथील नागरिकांनी यासाठी पुढाकार घेतला.

याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयरचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले , “भारतामध्ये कोरोनाच्या लसीकरण मोहीम सुरू झाल्यात. पण, त्याविषयीही लोकांच्या शंका आहेत. कारण, घाई-गडबडीत लशींना परवानगी मिळाली आहे का ? अथवा याचे दुष्परिणाम काय होतील ? असे अनेक प्रश्न नागरिकांना सतावत आहे या सर्व शंका कुशंकांचे उत्तर या परिचारिका देत असून ही लसीकरण मोहिम यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.”
कोरोना कालावधीत कोरोना व इतर आजार झालेल्या नागरिकांना हात लावण्यासाठी कोणीही धजावत नसे अशावेळी फक्त डॉक्टर,नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफ सेवेसाठी उपलब्ध होता अशी भावना जुईनगर येथे राहणारे श्री रमणिक पुरंदरे यांनी व्यक्त केली.
भावाने बहिणीचे रक्षण करावं याकरता त्याच्या मनगटावर राखी बांधली जाते परंतु कोरोनाच्या लढाईत नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या परिचारिकांच्या म्हणजेच आपल्या बहिणींच्या मनगटावर राखी बांधून समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.








Be First to Comment