Press "Enter" to skip to content

नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरील खड्डे बुजवीण्याच्या परेश ठाकूर यांच्या सुचेना

सिटी बेल | पनवेल |

पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल येथील महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

पनवेल शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. सदरची बाब लक्षात आल्याने शहर अभियंता संजय कटेकर यांच्यासोबत उड्डाणपुलावर सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली. खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये याची दक्षता घेत सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत यांनी संजय कटेकर यांना त्या संदर्भातील सूचना केल्या.

यावेळी भाजपचे उमेश इनामदार, मोतीराम कोळी, पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी साळुंके तसेच टी.आय.पी.एल कंपनीचे इंजिनियर संतोष कडू उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.