Press "Enter" to skip to content

स्टोन क्रशरव्यावसायिकांना मिळाला दिलासा : पुन्हा सुरू होणार स्टोन क्रशरची धडधड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कॉरी असोसिएशन च्या शिष्टमंडळाने घेतली तहसिलदारांची भेट

सिटी बेल | पनवेल |

गेले काही दिवस बंद असलेल्या स्टोन क्रशर कॉरी प्लांट मुळे व्यावसायिकांचे नुकसान होत होते. हा व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा म्हणून स्टोन क्रशर कॉरी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, काॅंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत,काँरी क्रशर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष सुनील धनाजी शेठ भोईर, उपाध्यक्ष मनोज आंग्रे, सचीव अतुल भगत, रिशीकेश ठाकूर, खजीनदार विवेक दापोलकर, मयूर भोईर, सचिन वास्कर,उदय ठाकूर, ऋषी ठाकूर आदी मान्यवरांच्या सह स्टोन क्रशर कॉरी व्यावसायिक उपस्थित होते.

यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, मुंबईतून काही उच्च न्यायाधीश येथील जागेची पाहणी करण्याकरता येणार असल्याकारणाने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून स्टोन क्रशर कॉरी व्यावसायिकांनी जवळपास एक आठवडा त्यांचे प्लांट बंद ठेवले होते. अपेक्षित न्यायाधीशांच्या भेटीनंतर सुद्धा हे प्लांट सुरू करण्यात न आल्याने व्यावसायिकांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत होता. त्यांची कैफियत मांडण्यासाठी व्यावसायिकांचे शिष्टमंडळ आज तहसीलदारांना भेटले. योग्य जागेवर योग्य रॉयल्टी भरणाऱ्या व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू करण्यास हरकत नसल्याचे तहसीलदार तळेकर यांनी सांगितले आहे. तसेच सिडकोच्या भूखंडांवर ज्यांचे प्लांट उभे आहेत त्यांना देखील व्यवसाय करण्यास अनुमती मिळाली आहे. लवकरच आम्ही स्टोन क्रशर प्लांट व्यवसायिक, सिडको अधिकारी आणि प्रशासन यांचे मध्ये संयुक्त बैठक घेऊन व्यावसायिकांच्या समस्या विस्ताराने मांडणार आहोत.

बंद असलेले स्टोन क्रशर सुरू होणार असल्याने आनंदी झालेले व्यावसायीक

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.