कचरा घंटा गाडीत टाकण्यासाठी पालिका कर्मचारी सोसायटीच्या झाडूवाल्याकडून घेत आहेत पैसे
सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेत पैसे मोजल्याशिवाय कामेच होत नाहीत. साधा पडलेला कागद उचलायचा झाला तरी पैसे द्यावे लागतात असा खळबळ उडवून देणारा पालिका प्रशासनाचा कारभार चव्हाटयावर आणणारा आरोप नगरसेवक गोपाळ भगत यांनी केला आहे.
पालिका हद्दीतील सोसायट्यामधील कचरा साफ करण्यासाठी सोसायट्याने झाडूवाले ठेवले आहेत. ते झाडूवाले सोसायटीची साफसफाई करून सोसायटीतून निघालेला कचरा सोसायटीच्या गेट वर ठेवतात. तो कचरा घंटा गाडीत टाकण्यासाठी पालिका कर्मचारी झाडूवाल्याकडून पैसे घेत आहेत.

हाॅटेल मालकांकडून पैसे घेतात एवढ्या पर्यंत ठिक आहे. पण सोसायटीतील कचरा गाडीत टाकण्यासाठी झाडूवाल्याकडून पैसे घेतात एवढा खालच्या पातळीचा भष्ट्रचार पनवेल महानगरपालिकेत बोकाळला आहे असा सनसनाटी आरोप नगरसेवक गोपाळ भगत यांना केला आहे.
या प्रकाराबाबत नगरसेवक गोपाळ भगत यांनी महसभेत विषय चर्चेला घेवून असे प्रकार थांबविण्यात येवून सबंधितांवर करावाई करण्याची मागणी केली होती. पण कोणाकोणावर कारवाई करावी अशी उत्तरे अधिका-यांकडून मिळत असल्याने पैसे हाच प्रकार आता पालिका प्रशासनात राहिला असल्याचा गंभीर आरोप नगरसेविक भगत यांनी केला आहे.








Be First to Comment