सिटी बेल | उलवे | वैशाली कडू |
सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि वटवृक्ष सामाजिक संस्था- उलवे यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे ऊद्धाटन तथा पहिला वटवृक्ष इंटक राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत आणि साई देवस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या शुभहस्ते लावुन वृक्ष लागवड अभियानास सुरुवात झाली.
सह्याद्री देवराईचे सचिन चांदणे यांच्या मार्गदर्शानाखाली आज उलवे शहरांत १८ प्रकारची विविध वृक्षरोपण करण्यात आले. सदर वृक्ष अभियानास प्रमुख पाहुणे म्हणुन उरण नागांवचे माजी सरपंच परिक्षित ठाकूर, माजी भारतीय सैनिक निलेशदादा म्हात्रे, आमचे मार्गदर्शक धनंजय तांबे, वसंत वळकुंडे, प्रगतशील शेतकरी प्रशांत पवार, संस्थेचे उपाध्यक्ष नंदूशेठ ठाकूर, आदि वृक्षप्रेमींनी उपस्थित राहून भर पावसात एक एक झाड लावुन संस्थेला मोलाचे सहकार्य केलेत त्याबद्दल सर्व निसर्गमित्रांचे मनापासुन आभार.

त्याचप्रमाणे ज्यांच्या अथक मेहनतीने हे अशक्य कार्य पुर्ण होत आहे ते माझे सहकारी अनिल कांबळे, गणेश मढवी, रोहित कोळी, सचिन पाटील यांचे विशेष कौतुक. आपल्या अनमोल सहकार्याबद्दल सर्वांचे मनापासुन धन्यवाद मानण्यात आले.








Be First to Comment