२ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरने लावली आपल्या जीवाची बाजी
सिटी बेल | मुंबई |
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मधील केवनाळे या गावात घराची भिंत कोसळत असताना २ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरने आपल्या जीवाची बाजी लावली. मात्र या दुर्घटनेत पायावर भिंत कोसळल्याने तिला तिचा डावा पाय उपचारादरम्यान गमवावा लागला आहे परंतु याची सल तिच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही तर याउलट आपल्यामुळे एक जीव वाचविल्याचा आनंद तिच्या चेहेऱ्यावर दिसून येत आहे.
आज साक्षी दाभेकरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना आमदार व प्रवक्त्या डॉ मनीषा कायंदे यांनी मुंबईस्थित केईएम रुग्णालयात साक्षी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली व तिथेच तिचा वाढदिवस पुष्पगुच्छ केक व रोख रक्कम देऊन साजरा केला.

यावेळी डॉ. मनीषा कायंदे यांनी साक्षीच्या कुटुंबियांना धीर देत शिवसेना पक्ष कायम तुमच्या सोबत असेल व भविष्यातही कोणत्याही प्रकारची सरकारी अथवा अन्य मदत लागल्यास ती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या दोघीही बहिणींचे शैक्षणिक पालक पालकत्व स्वीकारले असून तिला जगातील सर्वोत्कृष्ट असा कृत्रिम पाय देखील तिला प्राप्त होईल असे आश्वासन दिले आहे.








Be First to Comment