Press "Enter" to skip to content

कुळ वहिवाट कायद्याच्या जमिन फेरफार करण्यासाठी मागीतली १५ हजारांची लाच

खळबळजनक : मुरुड तहसिलदार गमन गावीत यांच्यासाहित दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक

सिटी बेल | मुरुड | अमूलकुमार जैन |

कुळ वहिवाट कायद्याच्या जमिन फेरफार करण्यासंदर्भात पंधरा हजारांची लाच मुरुड तहसिलदार गमन गावीत यांच्यासह संदेश सदानंद वांळज,रेमनाथ शाम पाटील या दोन कर्मचार्‍यांना नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने मुरूड तालुक्यासहित जिल्हयात खळबळ उडाली आहे.

याबाबतचे वृत्त असे की तक्रारदार यशवंत पाटील याला आपल्या जमीनीच्या विक्रीसाठी त्यावर असलेले कुळ वहिवाटीचे 32 ग प्रमाणपत्रासाठी मुरुड तहसिलदार तथा शेतजमिन न्यायधिकार प्राधिकरणकडे मागणी करण्यात आली होती.मात्र मुरूड तहसीलदार गमन गावित यांच्या सांगण्याप्रमाणे लोकसेवक शिपाई संदेश सदानंद वांळज याने त्यासाठी तक्रारदार यशवंत पाटीलकडे मुरुड तहसिलदार गमन गावीत यांनी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यशवंत पाटीलने थेट नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधत तक्रार केली. मागितलेल्या लाचेचनुसायानर या तक्रारीची खात्री करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईचे पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. बुधवार दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान तक्रारदार यशवंत पाटीलकडून 15 हजार रुपयांची लाच तहसीलदार गमन गावित यांच्या सांगण्यावरून शिपाई रेमनाथ पाटील यास घेताना या पथकाने रंगेहाथ पकडले.

सदर सापळा हा ठाणे विभागाच्या लाच लुचपत विभागाचे अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई येथील लाच लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे पोलीस नाईक निलेश पांचाळ, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.