सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सव सुरू झाला आहे, महोत्सवाचे उदघाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.
“कर्जत तालुक्याला निसर्गाची देणगी लाभली आहे. त्यामध्येच आपल्या भागात विविध प्रकारच्या पौष्टिक आणि दुर्मिळ रानभाज्या सापडतात. अशा महोत्सवातून रानभाज्याना प्रसिद्धी मिळून रानभाज्यांची मागणी वाढण्यास मदत होईल. यानिमित्त कृषी विभागाचे मी अभिनंदन करतो. कर्जत – खालापूर मतदार संघातील नागरिकांनी नक्कीच या महोत्सवाचा आनंद घ्यावा आणि अधिकाधिक माहिती प्राप्त करावी असे आमदार महेंद्र थोरवे यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले.

यावेळी तहसिलदार इरेश चप्पलवार, नायब तहसिलदार राजश्री जोगी, कल्याणी कदम, पोलीस निरीक्षक अनिल विभूते, खालापूर पंचायत समिती सभापती वृषाली पाटील, जि.प.सदस्य नरेश पाटील, मोतीराम ठोबरे ,खालापूर पंचायत समिती उपसभापती विश्वनाथ पाटील, सदस्य उत्तम परबळकर, कांचन पारांगे, खालापूर मुख्याधिकारी सुरेखा भगणे, तालुका कृषी अधिकारी अर्चना नारनवर सूळ, कृषी साहाय्यक शिवाजी राठोड, नितीन महाडीक, रावसाहेब आंधळे, चेतन चौधरी, सागर माने, चित्रा सारंग, निलेश पाटील, मंजुशा शिंदे, प्रज्ञा पाटील, अर्चना गायकवाड, कल्पना इंगळे, चित्रिका सातपुते, नर्कषत्रा जाधव, परिवेक्षक एन.डि शिंदे, एस.टी. धुमाळ, नगरसेवक संकेत भासे, शिवसेना समन्वयक एकनाथ पिंगळे, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, रोहित विचारे जितू सकपाळ, अशोक मराजगे, शेतकरी संघटना अध्यक्ष सुभाष मुंढे, दिनेश शिंदे, रुपेश लबडे, समिर पिंगळे, सुनिल पाटील, अविनाश आमले, नितीन भद्रिके आदिसह मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासी बांधव उपस्थित होते.








Be First to Comment