पनवेल रेल्वे स्थानकात समस्यांचा पाऊस : स्टेशन मॅनेजर यांचे तत्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
पनवेल रेल्वेस्थानकाचा मेकओव्हर केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासह या परिसरात येऊ घातलेल्या विविध प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर या स्थानकाला वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. मात्र पनवेल रेल्वे स्टेशन मध्ये समस्यांचा पाऊस सुरू असल्याचे प्रवासी सांगत आहेत.

कोरोना काळात उपनगरीय रेल्वे सेवा सर्व सामान्यांसाठी बंद जरी असली तरी लांब पल्यांची रेल्वे सेवा सुरू आहे. पनवेल स्थानकातून परराज्यात जाणाऱ्या 15 ते 20 गाड्या रोज येत असतात. अशात प्रवाशांकडून बऱ्याच तक्रारी भारतीय रेल्वे मंत्रालय सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्या नंतर अभिजीत पाटील यांनी पनवेल स्टेशन प्रबंधक यांची भेट घेत प्रवाष्याना होत असलेल्या समस्येचां पाढाच वाचला . यावेळी त्यांच्या सह पनवेल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ भक्तिकुमार दवे, यशवंतराव ठाकरे – पनवेल प्रवासी संघाचे उपाध्यक्ष, डॉ. मनीष बेहरे, पनवेल प्रवासी संघ सदस्य , कुणाल लोंढे, रेल्वे स्थानक स्थानीय प्रवासी संघटनेचे सल्लागार उपस्थित होते. यावेळी नागपूर ते गोवा, मडगाव रेल्वे सेवा ही फक्त सन आणि उत्सवांच्या वेळीच सुरू असते मात्र. पनवेल आणि आजूबाजूच्या शहरात विदर्भात तसेच कोकण, आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ही रेल सेवा दररोज सुरू करावी अशी प्रमुख मागणी केली.

पनवेल रेल्वे स्थानकात समस्यांचा पाऊस
पनवेल रेल्वे स्थानकामध्ये ७ फलाट असून त्यातील ४ उपनगरी तर ३ लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात. लांब पल्ल्यांच्या गाड्या 5 , 6 आणि 7 प्लॅटफॉर्म वरून वाहतूक सुरू असते. मात्र अश्यात प्रवाश्यांना शौचालयासाठी फक्त एकच स्वचछतागृह आहे. त्यात पाण्याची व्यवस्था नाही. पर राज्यात जाणाऱ्या गाड्यांची वेळ मागे पुढे होत असते. बऱ्याचदा वाट पाहावी लागते. रेल्वे स्थानकात एकच विश्राम गृह (waiting room) आहे ते कमी पडत आहे. प्रवाश्यांना ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्म वरच झोपावे लागते. बसण्यासाठी असलेली बाकही मोडकळीस आलेली आहेत. त्यात पिण्याच्या पाण्यासाठी असलेली नळ सुरूच असलेली पाहायला मिळतात. त्याचे पाणी सुद्धा प्लॅटफॉर्म वर वाहत असते. त्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत. प्लॅटफॉर्म वर इलेक्ट्रिक Dp aani त्यातील वायरी बाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ. नागरिकांसाठी लिफ्ट ची सुविधा तसेच सर्व प्लॅटफॉर्म वर एक्सलेटर सुरू करावे जे फक्त एकच ठिकाणी सुरू आहे. या आणि अशा अनेक समस्या पनवेलचे स्टेशन प्रबंधक यांच्या समोर मांडल्या.

स्टेशन मॅनेजर यांचे तत्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश
अभिजीत पाटील यांची नुकतीच रेल्वे मंत्रालय सल्लागार समिती सदस्यपदी निवड झाली आहे. रेल्वे बोर्डाच्या समितीवर निवड होताच अभिजीत पाटील यांनी कामाचा तडाखा सुरू केला आहे. पनवेल रेल्वे स्टेशन आणि प्रवश्याना जाणवलेल्या समस्या अभिजीत पाटील यांनी स्टेशन प्रबंधक यांच्यासमोर मांडल्या आणि त्या समस्या सोडविण्याचे आपले आद्य कर्तव्य असल्याचे ठणकावून सांगितले. यानंतर स्टेशन बंधक यांनी लगेच समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश संबधित अधिकारी आणि कांत्रादरास दिले.

पनवेल रेल्वे स्टेशनचे रुपडे बदलणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचा ‘नैना’ प्रकल्प, मेट्रोचे जाळे, जेएनपीटीचा विस्तार तसेच शिवडी-न्हावाशिवा सी-लिंक व नेरुळ-उरण रेल्वे आदीमुळे रायगड जिल्ह्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. भविष्यात
विकासाचा केंद्रबिंदू पनवेल ठरणार आहे. सध्याच्या पनवेल स्थानकातून अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या सुटतात, त्यामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. भविष्यात या स्थानकांवर ताण वाढण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर काळाची गरज म्हणून पनवेल स्थानकाचा मेकओव्हर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव मध्य रेल्वेला सादर करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या मान्यतेनंतर स्थानकाच्या विस्तारीकरणाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. सीएसएमटीच्या पार्श्वभूमीवर या स्थानकाचा विकास करण्याची योजना आहे. पनवेल आणि परिसराचा भविष्यकालीन विकास व विस्तार लक्षात घेवून या स्थानकात अत्याधुनिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
फलाटांची संख्या वाढवण्याचे काम सुरू
आणखी तीन फलाटांची वाढ
अडीच हजार कोटी खर्चाचा सीएसटी-पनवेल कॉरिडोर
प्रकल्पात सिडकोचा ६७ टक्के तर रेल्वेचा ३३ टक्के सहभाग असणार.









Be First to Comment