सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, महसूल विभाग आणि उरण सामाजिक संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजाला आवश्यक कागदपत्रे बनवण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी दिलेल्या आरक्षण सुविधे पासून आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे वंचित राहिलेला आदिवासी समाजास ही सर्व कागदपत्रे काढून देण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, महसूल विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण आणि उरण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दोन वर्षांपासून पुढाकार घेतला असून आज पर्यंत अनेक कागदपत्रे बनवून दिलेली आहेत. त्यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदानाचे कार्ड,बँकेचे पास बुक जातीचे दाखले इत्यादी कागदपत्रे बनवून दिलेली आहेत. परंतु को रो ना विषाणू च्या प्रादुर्भाव वाढला आणि दुसऱ्या लाटेमुळे काही काळ हे काम थांबले होते.
परंतु कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर जगातील आदिवासी दिनाचे औचित्य साधून ही मोहीम पुन्हा ९ ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली. ह्या दुसऱ्या टप्प्यातील मोहिमे अंतर्गत प्रामुख्याने जातीचे दाखले आणि वन हक्क दावे यावर भर देण्यात येणार आहे. तसेच राहिलेले रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदानाचे कार्ड, बँकेचे पास बुक इत्यादी चालूच राहणार आहे. सदर मोहीमेसाठी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, नायब तहसीलदार पेडवी, सौ गोरेगावकर मॅडम पुरवठा अधिकारी, सौ. आशा म्हात्रे मॅडम निवडणूक कक्ष अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले. तसेच जातीचे दाखले काढण्यासाठी उरण येथील सेतू कार्यालयातील शरयू मॅडम आणि त्यांच्या टीमने मेहनत घेतली.

तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या आदेशाने सेतू कार्यालयात जवळ जवळ एक हजार जातीच्या दाखले काढण्याचे काम सुरू असून त्यातील जवळ जवळ ३०० दाखले तयार झालेले आहेत. जातीचे दाखले काढण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण या कार्यालय तून विशेष सहकार्य मिळाले. आदिवासी प्रकल्प अधिकारी सौ अहिर राव मॅडम, ऑफिस सुप्रीन्टेंडेंट आनंद पाटील, आदिवासी तपासणी अधिकारी भानुशाली आणि दळवी, तसेच चव्हाण यांनीही सहकार्य केले. उरण तालुका वन अधिकारी श्री शशांक कदम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले असून वन हक्क दावे करण्यासाठी ते पूर्ण सहकार्य करणार आहेत, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
तसेच खाव टी योजनेचा लाभ सर्वांना मिळावा ह्या करिता उरण सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आणि चिरनेर येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मोरे सर आणि त्यांच्या सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वतः घरोघरी जावून त्यांची कागदपत्रे गोळा करून ही योजना सर्व आदिवासी बांधवांना कशी मिळेल याची काळजी घेतली.
ही सर्व मोहीम यशस्वी होण्यासाठी कातकरी प्रतिनिधी मनीष कातकरी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, कंठवली आणि रायगड भूषण दत्ता गोंधळी वेश्वि यांनी अतोनात प्रयत्न केले. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सर चिटणीस संतोष पवार, प्रा. राजेंद्र मढवी आणि सर्व सदस्यांचा सहभाग आणि मार्गदर्शन नेहमीच राहिले आहे.








Be First to Comment