सिटी बेल |उरण | सुनिल ठाकूर |
राज्याच्या विविध भागातल्या पूरस्थितीमुळे तेथील रहिवाशांचे जीवन उद्ध्वस्त करून टाकले असून, त्या ठिकाणी आता तिथल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे. सरकारने देखील पुरामुळे नुकसान झालेल्या भागांमध्ये सर्वोतोपरी मदत केली आहे. तिथल्या परिस्थितीवर नुसतीच सहानभूती दाखवून चालणार नाही, याकरीता प्रत्येकाला खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत करणे गरजेचे आहे. दरम्यान अशा नाजूक प्रसंगी ग्रामपंचायत भेंडखळ तर्फे महाड व चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. जिथे कुठलीच मदत पोहचली नव्हती तिथे जाऊन तेथील कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले.

यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच कुमारी भाग्यश्री चव्हाण ,उपसरपंच लक्ष्मण शेठ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या सौ. संध्या दिपक ठाकुर, सोनाली ठाकूर, सौ.नीलम भोईर,सौ.स्वाती घरत, सौ.नीता ठाकूर, सौ.योगिता ठाकूर, सौ.सुचित्रा ठाकूर ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ठाकूर, किशोर ठाकुर, रतन ठाकूर, ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे . ग्रामपंचायत भेंडखळ कर्मचारी सौ. निशा वशेणीकर , दिपाली मते, रावले, मंगेश, कौस्तुभ ठाकुर, सौ. वंदना चव्हाण आदी उपस्थित होते.














Be First to Comment