महाड व चिपळूण येथील पूरग्रस्तांना जय मातादी ग्रुप व ग्रामपंचायत दिघोडे ने दिला मदतीचा हात
सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
राज्याच्या विविध भागातल्या पूरस्थितीमुळे तेथील रहिवाशांचे जीवन उद्ध्वस्त करून टाकले असून, त्या ठिकाणी आता तिथल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे. सरकारने देखील पुरामुळे नुकसान झालेल्या भागांमध्ये सर्वोतोपरी मदत केली आहे. तिथल्या परिस्थितीवर नुसतीच सहानभूती दाखवून चालणार नाही, याकरीता प्रत्येकाला खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत करणे गरजेचे आहे.

दरम्यान अशा नाजूक प्रसंगी दिघोडे येथील निलेश पाटील व प्रफुल्ल पाटील यांच्या “मी दिघोडेकर” या संकल्प नेतून जयमातादी ग्रुप व ग्रामपंचायत दिघोडे तर्फे जय मातादी ग्रुप चे अध्यक्ष मयूर घरत यांच्या नेतृत्वा खाली महाड व चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. जिथे कुठलीच मदत पोहचली नव्हती तिथे जाऊन तेथील कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले.

यावेळी सरपंच सौ.सोनिया घरत, जयमातादी ग्रुप चे आध्य्क्ष मयूर घरत, निलेश पाटील, प्रफुल्ल पाटील, मयूर माळी,अश्विन पाटील, अस्मित पाटिल,मयूर पाटील,अमित पाटील, प्रणय वाणी, आशिष पाटील शुभम पाटील, विनय म्हात्रे,नितेश पाटील,राजकुमार म्हात्रे, सुमित म्हात्रे, विनय म्हात्रे,विरेंद्र घरत,अंकित पाटील आदी उपस्थित होते.









Be First to Comment