शेकाप नगरसेवक रविंद्र भगत यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
कळंबोलीसह पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने ( व्यवसाय ) सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी नगरसेवक रविंद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
दोन वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे दुकानदार कर्जबाजारी झाले असल्याने त्यांना दुकाने बंद करून आपआपल्या गावी जावे लागले आहे. नागरिकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तसेच सध्याच्या घडीला पूर्णवेळ व्यवसाय करू शकले नसल्याने त्यांचे भाडे कामगारांचे पगार देणे मुश्कील झाल्याने सदर व्यवसाय बंद पडण्याच्या घडीला आहेत.
आता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्या कारणाने सकाळी सात रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.








Be First to Comment