Press "Enter" to skip to content

गोदी नदी पात्रातील गाळ कोलाड-आंबेवाडी नाका पुराच्या पाण्यापासून वाचला

व्यापारी आणि ग्रामस्थांनी मानले खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांचे आभार

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

पावसाळ्यात जरासे जरी पाणी झाले तरी कोलाड-आंबेवाडी नाका हा नेहमीच जलमय झालेला दिसून येतो.परंतू या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून देखील व ठिकठिकाणी पूर येऊन देखील कोलाड-आंबेवाडी नाक्यावर जराही पुराचे पाणी आले नसल्याने रहिवासी वर्ग व व्यापारी वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला.

याबाबतचे सारे श्रेय रायगडचे खासदार सुनील तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांना जात असल्याची माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रितम पाटील यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना रायगडचे खा.सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून व पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याने कोलाड-आंबेवाडी येथील गोदी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर साठलेला गाळ गतवर्षी काढण्यात आला. गाळ काढल्याने नदीपात्राची खोली वाढल्याने मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात पाणी साठू लागल्याने व पाणी धारण करण्याची क्षमताही वाढल्याने मोठ्या प्रमाणावर पडलेले पावसाचे पाणी नदीपात्रात साठून राहिल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून देखील त्याचा काहीएक परिणाम नाक्याला झाला नसल्याने ब-याचशा बाबतीत त्याचे सकारात्मक परिणाम सुद्धा दिसून आले.

जुलै महिन्यात तिस-या आणि शेवटच्या आठवड्यात चांगलाच मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने बहुतांश भागात पुर देखील आला. परंतु गोदी नदीपात्रातील. साठलेला गाळाची समस्या रहिवासी वर्गाने जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी या समस्येबाबत जातीने लक्ष देऊन व सततच्या केलेल्या पाठपुराव्याने नदीपात्रातील गाळ काढल्याने कोलाड-आंबेवाडी नाक्यावर या वर्षी पुराचे पाणी आले नसल्याने येथील रहिवासी वर्ग व व्यापारी चांगलाच दिलासा मिळाला असल्याने समाधानही व्यक्त करण्यात येत असल्याचे शेवटी अध्यक्षा प्रितम पाटील यांनी माहिती देताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.