Press "Enter" to skip to content

युवा नेतृत्व यतिन देशमुख यांच्यावर शिवसेना उपमहानगरप्रमुखपदाची धुरा

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

युवा नेतृत्व यतिन देशमुख यांच्यावर नवीन पनवेल आणि पनवेल शहर शिवसेना उपमहानगरप्रमुखपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

नुकतीच शिवसेना नवीन पनवेल आणि पनवेल शहर उपमहानगरप्रमुखपदी यतिन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी यांच्या संमतीने जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाने यतिन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यांच्या निवड़ीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. नुकतेच त्यांना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी नियुक्ती पत्र दिले. यावेळी महानगर समन्वयक पनवेल तालुका गुरूनाथ पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.