Press "Enter" to skip to content

काशीद च्या नव्या पुलाचे स्व.विजय चव्हाण पूल असे भाजपने केले नामकरण

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

मुरूड तालुक्यातील काशीद पूल दुर्घटनेमध्ये एकदरा येथील विजय चव्हाण यांचा दुर्दैवी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. काशीद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे नामकरण रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्व.विजय चव्हाण पूल असे करण्यात आले आहे.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हाअध्यक्ष ऍड.महेश मोहिते,अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष निलेश महाडिक,मुरुड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रोहन खोपकर, अलिबाग तालुका उपाध्यक्ष आदित्य नाईक, माजी तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी,संदीप चिरायू ,मिलिंद खोपकर आदीसाहित जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ऍड.महेश मोहिते मोहिते यांनी सांगितले की,सदर पुलाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी या पूल दुर्घटनेमध्ये विजय चव्हाण यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.त्यांच्या नावाने अनावरण करून पुलाचे उदघाटन करणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे आवश्यक होते .म्हणून आज भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांना काशीद येथे येऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि पुलाचे नामकरण सुद्धा स्व.विजय चव्हाण पूल असे केले आहे.

नुकतेच पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते परंतु त्यावेळी मयत विजय चव्हाण यांना साधी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नाही ही खेदाची बाब आहे.उदघाटन कर्त्यांनी केलेल्या चुकीमुळे आज आम्हाला येथे येऊन पक्षाच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम आणि नामकरण करावे लागले.

11 जुलै2021 रोजी रात्री आठच्या सुमारास मुसळधार पावसामुळे काशीद गावाला जोडणारा पूल वाहून गेला होता या पूल दुर्घटनेत तालुक्यातील मौजे एकदरा येथील विजय चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबीय पोरके झाले आहे.शासनाने दिलेली मदत ही तुटपुंजी स्वरूपातील आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी मन लावुन पंचवीस दिवसात पूलाचे काम केले.त्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने धन्यवाद देऊ तितके कमी असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.